देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे आज भर बाजारतळावर चहा विक्रेत्याला लोखंडी गजाने मारहाण करून त्याच्या घरातील आज...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे आज भर बाजारतळावर चहा विक्रेत्याला लोखंडी गजाने मारहाण करून त्याच्या घरातील आज्जीला घरी जाऊन मारहाण केल्याची घटना घडली याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणी साठी उद्या बुधवार १३ जुलै रोजी सकाळी देवळाली प्रवरा बंदची हाक देवळाली प्रवरा व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आली असून सकाळी ९ वाजता घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार असल्याचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश वाळुंज व कार्याध्यक्ष डॉ.विश्वास पाटील यांनी आवाज जनतेशी बोलताना माहिती दिली.
याबाबत बोलताना सतीश वाळुंज व विश्वास पाटील म्हणाले की,देवळाली प्रवरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून चहा विक्री करणाऱ्या गरीब कुटुंबातील तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली त्याचप्रमाणे त्याच्या घरी जाऊन घरातील सदस्यांनाही मारहाण करण्यात आली.
ही घटना निश्चितच निषेधार्थ असून याप्रकरणातील आरोपींना अटक करावी यासाठी देवळाली प्रवरा शहर बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच सकाळी ९ वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात व्यापारी छोट,मोठे दुकानदार शहरवासीय यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देवळाली प्रवरा व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत