गौतम पब्लिक स्कूलमध्ये रंगला आषाढी वारीचा रिंगण सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गौतम पब्लिक स्कूलमध्ये रंगला आषाढी वारीचा रिंगण सोहळा

कोपरगाव प्रतिनिधी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात येते. मात्र ...

कोपरगाव प्रतिनिधी



कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात येते. मात्र दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना संकटामुळे ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला वारकऱ्यांना जाता आले नाही त्याप्रमाणे गौतम पब्लिक स्कूलमध्ये देखील आषाढी वारीचा सोहळा झाला नाही. मात्र यावर्षी संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात वारीचे आयोजन करून त्याचबरोबर आषाढी वारीत होणारा रिंगण सोहळा देखील आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांनी याची देही, याची डोळा वारीच्या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला.



यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून पालखी दिंडी काढली. लहानग्या कलाकारांनी पांडूरंगाच्या भक्तीत तल्लीन होवुन भक्तीगित आविश्कार सादर केला. त्यानंतर सजवलेल्या पालखीतील प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य नूर शेख म्हणाले की, दिंडी ही महाराष्ट्राच्या  संस्कृतीचा भाग आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची गुणवत्ता देण्याबरोबरच  विद्यार्थ्यांमध्ये एकता,  समता, बंधुता अशी  धर्मिक व सामाजिक नैतिक मूल्य विद्यार्थी दशेत रूजविणे काळाची गरज आहे. त्यामुळे आपण आपल्या सण रूढी, परंपरा जपल्या पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी सजवलेल्या पालखीचे प्रस्थान टाळ, मृदुंग व विठ्ठल नामाच्या गजरात शाळेपासून परिसरातील मारूती मंदिराकडे झाले. या दिंडीत शाळेच्या ११०० वारकरी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक-कर्मचारी यांच्या ताफ्यासह सहभाग घेतला होता.




पालखी मंदिरात विठ्ठल नामाचा गजर करत पोहचताच सर्व बाल वारक-यांनी विठ्ठल-रखुमाईचे भक्तिभावाने दर्शन घेतले. वारक-यांचे भव्य रिगंण बनवुन त्यामध्ये अश्वप्रदक्षिणा पार पडली. झेंडेकरी व मेंढयांच्या भव्य रिंगणाने भक्तीमय वातावरणात विठ्ठलाच्या नामघोषात आसमंत दुमदुमुन गेला होता. अभ्यास, खेळ व सुसंस्कार करण्याच्या दृष्टीने गौतम पब्लिक स्कूलमध्ये आयोजित केलेल्या या दिंडीचे संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त ना.आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, सहसचिव सौ.स्नेहलताताई शिंदे, सर्व संस्था सदस्य, गांवकरी व पालकांनी कौतुक केले आहे.


सदर दिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी युरोकिड्स विभागाच्या हेडमिस्टेªस सौ.विमल राठी, शाळेच्या पर्यवेक्षिका  ज्योती शेलार, सौ.सुनिता कुलकर्णी, कार्यक्रम प्रमुख कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण, सौ.रेखा जाधव, ओम गोसावी, फिजीकल डायरेक्टर सुधाकर निलक त्यांचे सहकारी रमेश पटारे सर्व शिक्षक आदींनी विषेश परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत