कोपरगांव :- प्रतिनिधी गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीमुळे सार्वजनिक बससेवेला मर्यादा होत्या आता मात्र कोरोनाची परिस्थिती पुर्वपदावर ...
कोपरगांव :- प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीमुळे सार्वजनिक बससेवेला मर्यादा होत्या आता मात्र कोरोनाची परिस्थिती पुर्वपदावर येत असल्यांने कोपरगांव आगारातुन पोहेगांव मार्गे पाथरे नाशिक मुंबई बससेवा पुर्ववत सुरू करण्यांत आली आहे अशी माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली.
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, पुर्वी कोपरगांव आगारातुन पोहेगांव मार्गे पाथरे नाशिक मुंबई बससेवा सुरळीत सुरू होती पण कोरानामुळे ती बंद करण्यांत आली होती त्यावर प्रवाशांनी ही बससेवा पुर्ववत सुरू करावी म्हणुन मागणी केली होती. त्याबाबत कोपरगांव आगारप्रमुख अभिजित चौधरी व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाचे विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणीही केली होती, त्याप्रमाणे कोपरगांव आगाराची ११ वाजेची नाशिक व दुपारी ४ वाजेची कोपरगांव त्रंबकेश्वर हया बसेस पोहेगांव मार्गे पुर्ववत सुरू झाल्या असल्याचे पत्र अहमदनगर विभागाने ४ जुलै रोजी दिले आहे, तेंव्हा प्रवाशांनी सुरक्षीत प्रवासासाठी या बससेवेचा उपयोग करावा असे आवाहन शेवटी सौ. कोल्हे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत