राहुरी(वेबटीम) वांबोरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका पुन्हा सुरू करावी या मागणीचे निवेदन आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष प...
राहुरी(वेबटीम)
वांबोरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका पुन्हा सुरू करावी या मागणीचे निवेदन आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी वांबोरीचे सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हंटले की, रामनाथजी वाघ संकुलामध्ये ग्रामपंचायत गेट शेजारी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या वाचनालयामध्ये अनेक पुस्तके वांबोरी गावच्या व पंचक्रोशीतील स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विदयाथ्र्यांसाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गेल्या तीन चार वर्षापुर्वी अभ्यासिका चालु करण्यात आली असून त्याचा लाभ अनेक विदयार्थ्यानी घेतला होता. परंतु कोरोनाच्या काळामध्ये हि अभ्यासिका बंद ठेवण्यात आली असून अद्यापपर्यंत ती चालु झालेली नसुन त्या अभ्यासिकेमध्ये व्यायाम शाळा गेल्या काही दिवसांपासुन चालु केलेली आढळून आली. तरी ग्रामपंचायतीने पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका पुन्हा चालु करून गोरगरीब विदयार्थ्याची मदत करावी अशी मागणी प्रदीप मकासरे यांनी केली आहे.
सरपंच किरण ससाणे व ग्रामसेवक गागरे भाऊसाहेब ग्रामपंचायत सदस्य विलास गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी परेश व्यास, अतिष मकासरे, सूरज मकासरे, सचिन मकासरे, भारत भांबळ, अमोल मकासरे ,सागर राजगुरू, शुभम मकासरे, रॉकी पवार, प्रमोद मकासरे, राहुल भांबळ, विशाल मकासरे, विशाल पाटेकरआदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत