राहुरी : वेबटीम कांद्याला तीस रुपये प्रती किलो भाव मिळावा, कांदयाची नाफेड मार्फत पूर्ववत खरेदी सुरू करावी, कांदा निर्यात प्रती किंटल पा...
राहुरी : वेबटीम
कांद्याला तीस रुपये प्रती किलो भाव मिळावा, कांदयाची नाफेड मार्फत पूर्ववत खरेदी सुरू करावी, कांदा निर्यात प्रती किंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे, इत्यादी शेतकरी मागण्यांसाठी मंगळवार दि 16 ऑगस्ट रोजी राहुरीत रास्तारोको करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविभाऊ मोरे यांनी दिला आहे.
तहसीलदार शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर जिल्हातील शेतकरी कांदा उत्पादक, यांच्या वारिल मागण्या राबत दि १६ ऑगस्ट २२ रोजी मंगळवारी, मार्केटयार्ड समोरील नगर - मनमाड रोड वर रस्ता रोको आंदोलन अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने करण्यात येणार आहे, अशी माहिती मोरे यांच्यासह युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देठे, तालुकाध्यक्ष सतीश पवार, बाळासाहेब जाधव, प्रमोद पवार, वंचीत आघाडीचे शहर अध्यक्ष पिंटू साळवे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत