सोनगाव,सात्रळ,धानोरे पंचक्रोशीच्यावतीने शिर्डी विमानतळावर येताच कॅबिनेट मंत्री नामदार विखे पाटील यांचे जंगी स्वागत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोनगाव,सात्रळ,धानोरे पंचक्रोशीच्यावतीने शिर्डी विमानतळावर येताच कॅबिनेट मंत्री नामदार विखे पाटील यांचे जंगी स्वागत

सात्रळ(वेबटीम)  राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आज शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात प्रथम क्रमांकाने कॅबिनेट पदाची श...

सात्रळ(वेबटीम)



 राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आज शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात प्रथम क्रमांकाने कॅबिनेट पदाची शपथ घेऊन पहिल्यांदा माननीय नामदार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील साहेब आज शिर्डी साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर आपल्या मतदार संघात आले असता सोनगाव सात्रळ धानोरे पंचक्रोशीच्या वतीने त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करून शेकडो कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत करून सत्कार केला.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी मोटरसायकलवर तिरंगा रॅली काढून घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील कारखान्याचे व्हा चेअरमन विश्वासराव कडू पाटील,सोनगावचे उपसरपंच तथा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष किरण पाटील अंत्रे,सेल मीडिया नगर दक्षिणचे रवींद्र दिघे,विजय नालकर, सोसायटीचे व्हा चेअरमन नारायण धनवट,सुभाष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संदीप अनाप,बाळासाहेब अंत्रे,एजाज तांबोळी,अल्पसंख्यांक आघाडीचे मोहम्मद तांबोळी,विजय वाकचौरे,रावसाहेब नालकर, बाळासाहेब पळघडमल सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत