ब्रह्मकुमारी 'विद्यालयाने साजरा केला सामुदायिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ब्रह्मकुमारी 'विद्यालयाने साजरा केला सामुदायिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम.

सात्रळ(वेबटीम) सात्रळ येथील प्रजापिता  ब्रम्हा कुमारी  ईश्वरीय  विश्व विद्यालय सेवाकेंद्र तर्फे  नारळी पौर्णिमा चे औचित्य  साधून सामुदायिक  ...

सात्रळ(वेबटीम)




सात्रळ येथील प्रजापिता  ब्रम्हा कुमारी  ईश्वरीय  विश्व विद्यालय सेवाकेंद्र तर्फे  नारळी पौर्णिमा चे औचित्य  साधून सामुदायिक  रक्षाबंधना चा कार्यक्रम  पार पडला. 


या प्रसंगी  ब्रह्मकुमारी  पद्मावती दिदी यांनी   उपस्तिथ  असलेल्या ब्रह्मकुमार बंधूंना  राखी बांधून रक्षाबंधन  चे अध्यात्मिक  रहस्य सूचित करवून बंधुभावना  जपण्याचे आवाहन  केले. तसेच आज प्रत्येकाला  तन, मन, धन, धर्म, नाते संबंध अश्या  अनेक बाबतीत असुरक्षिता जाणवत असून अशावेळी संपूर्ण  विश्वाचा रक्षक परमपिता परमात्मा  द्वारे बांधले जाणारे हे रक्षाबंधनाचे रक्षासूत्र हे अनोखे  रक्षाकवच ईश्वरीय  वरदान  आहे.अनेक विकार, दुर्गुण, तसेच नकारात्मक विचारांपासून मुक्त करणाऱ्या या बंधनाची  गरज आज सर्वांनाच असल्याचे नमूद करत देशाच्या  स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षात प्रत्येकाने  "एक व्यक्ती, एक वृक्ष, एक परिवार "ही संकल्पना प्रत्यक्षात  आणण्यासाठी  आवाहन  केले.   या प्रसंगी ब्रह्मकुमार शिवाजी आप्पा , ब्रह्मकुमारी रेमन दिदी, ब्रह्मकुमारी  स्वातीदीदी, ऍड. बाळकृष्ण  चोरमुंगे, शांतीभाऊ गांधी, भाऊसाहेब  सजन, सुभाष शेजवळ, प्रकाशशेठ वालझाडे,संतोषशेठ लोढा, राजुशेठ  बुऱ्हाडे, दत्तात्रय  शिंदे, संतोष नहार,  जयाजी अंत्रे, शंकर प्रधान, सौ. मंगलताई  चोरमुंगे, अर्चन प्रधान, सौ. वैशाली वालझाडे, सौ. अनिता  वालझाडे तसेच ग्रामस्थ  मोठया  संख्येने  उपस्तिथ होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत