नगर शिर्डी रोडच्या दुरुस्तीची निविदा निघाल्याने स्वातंत्र्यदिनी होणारे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर शिर्डी रोडच्या दुरुस्तीची निविदा निघाल्याने स्वातंत्र्यदिनी होणारे

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर शिर्डी रोडवर पडलेले खड्डे 15 ऑगस्ट 2022 पर्यंत तात्काळ डांबरीकरण...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर शिर्डी रोडवर पडलेले खड्डे 15 ऑगस्ट 2022 पर्यंत तात्काळ डांबरीकरण करून बुजविण्यात यावेत यासाठी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने राहुरी तहसीलदार एफ आर शेख यांना 9 ऑगस्ट 2022 रोजी निवेदन देण्यात आले होते.

 दि 14 ऑगस्ट 2022 पर्यंत रोडवरील हे खड्डे बुजविण्यात आले नाही तर स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 2022 रोजी नगर मनमाड रोडवर ठीक ठिकाणी बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते

 परंतु नॅशनल हायवे ऑफ ओथोरीटी च्या वतीने तात्काळ 11 ऑगस्ट रोजी रोडच्या दुरुस्तीसाठी 15 कोटी ची वर्क ऑर्डर मंजूर करण्यात आली व मशिनरी व प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागितला होता

  दि 14 ऑगस्ट 2022 रोजी तहसीलदार एफ आर शेख यांनी कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन 

नॅशनल हायवे ऑफ ओथोरीटी चे प्रतिनिधी एम एम सय्यद व कृती समितीच्या प्रतिनिधींची राहुरी तहसील कार्यालय येथे बैठक आयोजित केली होती

या बैठकीत नॅशनल हायवे ऑफ ओथोरीटी च्या प्रतिनिधींनी सांगितले की नगर शिर्डी रोडच्या दुरुस्तीचे काम  जयहिंद रोड बिल्डर्स नवी मुंबई या कंपनीला हे काम दिले असून येत्या 4 दिवसात रोडच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल

परंतु कृती समितीच्या आग्रहास्तव तहसीलदार शेख यांनी राहुरी फॅक्टरी,राहुरी येथे अपघात प्रवण क्षेत्रात उद्या तात्काळ मुरूम टाकून रोड प्रवासायोग्य करण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या. 

    या बैठकीनंतर कृती समितीच्या वतीने उद्या 15 ऑगस्ट 2022 रोजी होणारे बेमुदत रस्ता रोको आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे असे सांगण्यात आले.

 यावेळी राहुरीचे तहसीलदार एफ आर शेख,नॅशनल हायवे ऑफ ओथोरीटी चे प्रतिनिधी एम एम सय्यद,पोलीस प्रशासनाच्या वतीने सज्जन नरडा,कृती समितीच्या वतीने वसंत कदम,देवेंद्र लांबे,सुधाकर आदिक,वैभव गाढे,सुनील विश्वासराव,ज्ञानेश्वर मोरे,राजेंद्र बोचकरे,संदेश पाटोळे,हसन सय्यद,अमोल वाळुंज,रफिक सय्यद,सनी गायकवाड  आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत