राहुरी फॅक्टरी(वेबटीम) गेल्या अनेक वर्षांपासून डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील सामूहिक झेंडावंदन व विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सां...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील सामूहिक झेंडावंदन व विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण बंद करण्यात आले होते. मात्र भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त या कार्यक्रमास सुरुवात झाल्याने पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. देवळालीचे माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी खा.सुजय दादा विखे यांच्याकडे सदर कार्यक्रम सुरू करावेत अशी मागणी केल्यानंतर खा.विखे यांनी कारखाना प्रशासनास सुचना करून क्लब हाऊस प्रांगणात कार्यक्रम घेण्यास सांगितले. व त्यानुसार मोठा दिमाखदार सोहळा पार पडला.
तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील क्लब हाऊस प्रांगणात गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन साजरा होत असे. या ठिकाणी परेड संचलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी सादर करत असे. अगदी बालवाडीपासून ते आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असत. मोठी गर्दी व एक देशभक्तीमय वातावरण क्लब हाऊस प्रांगणात अनुभवयाला मिळत.
दरम्यान काही वर्षापासून क्लब हाऊस प्रांगणात हे कार्यक्रम, परेड संचलन घेण्याचे बंद करण्यात आले होते. त्यामुळे पालक व विद्यार्थी वर्गात नाराजी होती. देवळालीचे माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्याकडे 15 ऑगस्ला क्लब हाऊसला होणाऱ्या शाळा-कॉलेजच्या एकत्रित सांस्कृतिक कार्यक्रमांची काही वर्षांपासून खंडित झालेली परंपरा भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षी पुन्हा एकदा सुरू करावी अशी मागणी मा. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे नागरिकांनी व तरुणांनी केली होती. सत्यजित कदम यांनी पुढाकार घेऊन खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा केली त्यांनीही या बंद उपक्रमाचे स्वागत करून कार्यक्रम घेण्याबाबत कारखान्याच्या पदाधिकारी व व्यवस्थापन यांना सूचना केल्या. त्यानुसार मोठ्या आनंदात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव क्लब हाऊसच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
तसेच सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीने शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राथमिक आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी धृवराज सत्यजित कदम, सत्यजित कदम फाऊंडेशचे वप्रशांत कोठुळे, शशिकांत खाडे, रामेश्वर तोडमल, वसंत कदम, बाळासाहेब लोखंडे, मनोज भोंगळ, बाळासाहेब आढाव,प्रशांत काळे,वैभव गाडे,संदीप कदम, संदीप शेळके, शुभम कदम सलमान शेख, संदीप महाडिक आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत