राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वळण येथील भूमिपुत्र व ओडीसा राज्यातील मयूरभंज येथील जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश ज्ञानदेव खिलारी यांना भा...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील वळण येथील भूमिपुत्र व ओडीसा राज्यातील मयूरभंज येथील जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश ज्ञानदेव खिलारी यांना भारतीय स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले.
वळण येथील भूमिपुत्र ऋषिकेश खिलारी हे सध्या ओडीसा राज्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. मयूरभंज जिल्ह्यात त्यांनी केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने ओडीसा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
ऋषिकेश खिलारी यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित केल्यानंतर वळण येथे आनंद साजरा करण्यात आला. राष्ट्रपती शौर्य पदक सन्मानित जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश खिलारी हे युवा नेते राजुभाऊ शेटे यांचे भाचे आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत