राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आरडगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा येथे लोकनियु...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आरडगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा येथे लोकनियुक्त सरपंच कर्णा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुजन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच ,सदस्य तसेच सोसायटीचे आजी माजी चेअरमन, संचालक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळा व विठ्ठल रुक्मिणी विद्यालयाच्या विदयार्थी विद्यार्थिनी यांनी देश भक्तीवर गीत व नृत्य सादरीकरण केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत