सात्रळ ग्रामपंचायत उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ ग्रामपंचायत उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

  सात्रळ (वेबटीम) सात्रळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच  तांबोळी  यांच्यावर  दाखल  केलेला अविश्वास  ठराव 13 मताने मंजूर  झाला आहे.  एकूण 15 सदस्य ...

 सात्रळ (वेबटीम)



सात्रळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच  तांबोळी  यांच्यावर  दाखल  केलेला अविश्वास  ठराव 13 मताने मंजूर  झाला आहे. 


एकूण 15 सदस्य संख्या  असलेल्या ग्रामपंचायत  मध्ये  13सदस्यांनी  ठरावाच्या  बाजूने तर दोन सदस्य  गैरहजर  होते. अविश्वास  ठरावाची विशेष सभेच्या  अध्यक्षस्थानी  राहुरीचे तहसीलदार  फैससोद्दीन शेख होते. या सभेत  अविश्वासाचा  ठराव ग्रामपंचायत  सदस्य भाऊसाहेब रतन पडघलमल यांनी मांडला तर ठरावास अनुमोदन  गणेश कडू  यांनी दिले. या सभेसाठी  तहसीलदार  शेख यांना  तलाठी पंडित, ग्रामविकास  अधिकारी  हैदरभाई पटेल तसेच राहुरी तहसीलचे प्रशांत  औटी यांनी कार्यालयीन  कामकाजात  सहकार्य  केले. 

अविश्वास  ठराव प्रक्रिया  झाल्यानंतर  सात्रळ येथील ग्रामस्थांच्या  वतीने  जनसेवा  मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रतापराव  कडू यांच्या हस्ते तहसीलदार  शेख  यांचा  सत्कार  करण्यात  आला. या प्रसंगी  विखे कारखान्याचे संचालक  बाबुराव  पडघलमल, प्रवरा  बँकेचे  संचालक  साहेबराव  नालकर,  सदुभाऊ पडघलमल, सुभाषराव  डुक्रे, साळू पडघलमल, बिपीन ताठे, शिवाजी  नालकर, पत्रकार  अनिल वाकचौरे, शहाजी  शिंदे, इनामदार, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ  मोठया  संख्येने  हजर  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत