राहुरी(वेबटीम) राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ शिक्षण घेऊन एमएससी पदवी घेऊन राज्यलोकसेवा आयोग परीक्षेत्र राज्यात प्रथम येण्याचा ब...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ शिक्षण घेऊन एमएससी पदवी घेऊन राज्यलोकसेवा आयोग परीक्षेत्र राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविलेले अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप विष्णु निचित यांनी आज राहुरी कृषी विद्यापीठ येथे कामानिमित्त आले असता श्री.निचीत हे आपल्या जुन्या आठवणीत रमले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अनेक उच्च पदस्थ अधिकारी घडविले. विद्यापीठात शिक्षक घेतल्यानंतर अनेकांनी स्पर्धा परीक्षेस सामोरे जाऊन यशाकडे वाटचाल केली. महाराष्ट्र तसेच इतर राज्यात अनेक मोठमोठ्या पदांवर विद्यापीठातून शिक्षण घेतलेले अधिकारी पहावयास मिळतात.
मध्यंतरी राहुरी विद्यापीठात नोंदणीकृत व अनोंदणीकृत विद्यार्थ्यांत राडा होऊन हे प्रकरण राज्यभर गाजले. यावेळी विद्यापीठाची प्रतिमा मलिन झालेली पहावयास मिळाली.
दरम्यान आज विद्यापीठात सन २००२ ते २००४ या कालावधीत एमएससीचे शिक्षण घेतलेले अहमदनगरचे सध्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी अचानक भेट दिली.व पीएचडीचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांशिबीसंवाद साधला. ज्या ठिकाणी तास न तास अभ्यास करून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस सामोरे जाऊन राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला त्या क्लासमध्ये संदीप निचित यांनी काही तास बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या मातीमुळे मी स्वत: घडलो आणि आज उच्च पदावर काम करून जनतेची सेवा करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
संदिप निचित यांच्याकडे महसूल प्रशासनातील एक नम्र, तत्पर व अभ्यासू अधिकारी म्हणून बघितले जात आहे. संगमनेर येथे त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी पुरस्कार ने देखील सन्मानित करण्यात आले होते. आज त्यांनी विद्यापीठ येथे आपला काही काळ घालवून जुन्या आठवणींना उजाळा दिला हे मात्र तितकेच खरे.. त्यांनी सन २००६ साली लिहिलेला प्रबंध (thesis) यावेळी विद्यापीठ ग्रंथालयाने बघण्यासाठी उपलब्ध करून दिला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, तहसीलदार एफ.आर.शेख , विद्यापीठाचे एचडीओ महानंद माने, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत