"वयोश्री "योजनेचा लाभ घेणाऱ्यात नगर जिल्हा देशात अव्वल, श्रेय सर्वस्वी खा. डॉ. सुजय विखेंना, : - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

"वयोश्री "योजनेचा लाभ घेणाऱ्यात नगर जिल्हा देशात अव्वल, श्रेय सर्वस्वी खा. डॉ. सुजय विखेंना, :

सात्रळ (वेबटीम) भारताचे पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांच्या  संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय  वयोश्री  योजनेत  देशात  सर्वात  जास्त लाभार्थी...

सात्रळ (वेबटीम)



भारताचे पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांच्या  संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय  वयोश्री  योजनेत  देशात  सर्वात  जास्त लाभार्थींची संख्या  नगर जिल्हात  असून याचे  सर्वस्वी श्रेय या मतदार संघातील खासदार  डॉ. सुजय विखे यांना जात असून या मतदार संघात सुमारे 42 हजार  लाभार्थीना फायदा झाला आहे. तसेच पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी विविध योजने मुळे देशवासियांना दिलासा मिळाला असून पंतप्रधान मोदीचे आभार  मानले पाहिजेत असे विचार राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व  दुग्धविकास  मंत्री ना. राधाकृष्ण  विखे पाटील यांनी सात्रळ, सोनगाव, धानोरे  व  परिसरातील  इतर गावांच्या 763 लाभार्थींना  केंद्र सरकारच्या  वयोश्री  योजनेचे साहित्य  वाटपाच्या  कार्यक्रमात मांडले आहेत. 



राष्ट्रीय  वयोश्री  योजनेच्या लाभार्थींना साहित्य  वाटपाचा  आजचा  22 वा  कार्यक्रम  असून या राष्ट्रीय  वयोश्री योजनेच्या एकूण उपलब्ध निधी  पैकी नगर ज़िल्हा साठी  मोठया  प्रमाणात निधी खर्च झालेला आहे.  केंद्र  सरकारी तसेच राज्य  सरकार च्या विविध  योजनेची  माहिती नमूद करत महाराष्ट्रातील भा ज पा युतीचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांचे  सरकार हे  जनतेचे  सरकार  असून राज्याच्या  विकासाला गती देणारे सरकार असल्याचा उल्लेख  करत  ना. राधाकृष्ण  विखे पाटीलांनी नागरीकांनी   करोना  लसीचा बुस्टर  डोस  घेण्याचे  आवाहन  केले. या प्रसंगी  व्यासपीठावर  नासिक विभागाचे आयुक्त  गमे, प्रांत पवार, तहसीलदार  शेख,   तसेच विखे कारखान्याचे उपाध्यक्ष  विश्वासराव कडू, जेष्ठ कार्यकर्ते  सुभाष पा. अंत्रे,  प्रवरा ग्रामीण  शिक्षण संस्था चे संचालक  ऍड. अप्पासाहेब  दिघे, ऍड. बाळकृष्ण  चोरमुंगे, विखे  कारखान्याचे संचालक बाबुराव  पडघलमल, सुभाष  नामदेवराव अंत्रे, जे. पी. जोर्वेकर, रमेशराव पन्हाळे, प्रवरा बँकेचे  संचालक  साहेबराव  नालकर, बाळासाहेब  दिघे,किरण  दिघे,  नानासाहेब  गागरे विराजमान  होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विखे  साखर कारखानाचे  उपाध्यक्ष  विश्वासराव कडू यांनी केली व आपल्या  प्रास्ताविकात  ना. राधाकृष्ण  विखे यांचा  परिसराचे  "भाग्यविधाते "संबोधून  परिसरातील  विकास कामांचे श्रेय  विखेंना देऊन त्यासंबंधी गौरव  केला. 



मंत्री झाल्यानंतर  ना. राधाकृष्ण  विखे पाटील सात्रळ पंचक्रोशीत प्रथमच  आल्याने  परिसरातील  पदाधिकाऱ्यांनी  भव्य  असे ढोल  ताश्याच्या  गजरात व  फटाकड्यांच्या  आतषबाजीत स्वागत  केले. या कार्यक्रमासाठी  परिसरातील विविध संस्था चे  पदाधिकारी,सात्रळ, सोनगाव, धानोरे व परिसरातील  इतर गावांचे  सरपंच , उपसरपंच , सदस्य,  विखे  कारखान्याचे  मा. संचालक  सोपानराव पाराजी  दिघे, पाराजी  घनवट तसेच तालुका  भाजप  चे उपाध्यक्ष  नारायण  घनवट, जिल्हा  ओबी सी  युवा मोर्चा चे उपाध्यक्ष  किरण  अंत्रे, सोनगाव  सोसायटी चे अध्यक्ष  राजूभाऊ  अनाप,जिल्हा  भा ज पा  ओबीसी  युवामोर्चा चिटणीस  बिपीन  ताठे, युवा कार्यकर्ते  तसेच ग्रामस्थ व राष्ट्रीय  वयोश्री  योजनेचे लाभार्थी  मोठया  संख्येने हजर होते. आभार  ऍड. आप्पासाहेब  दिघे  यांनी मांडले.साहित्य  वाटपाच्या वेळी जेष्ठ लाभार्थींनी  ना. विखेंचे आभार मानत त्यांना धन्यवाद  दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत