देवळाली प्रवरा(वेबटीम) महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या भूमीत अनेक महान साधू संत होऊन गेलीत त्यांच्याच वारसेने आज आपला वारकरी संप्रदाय ट...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या भूमीत अनेक महान साधू संत होऊन गेलीत त्यांच्याच वारसेने आज आपला वारकरी संप्रदाय टिकून आहे, यामध्ये प्रत्येक समाजातून संत महात्मे होऊन गेलीत परंतु त्या संतांची शिकवण व कार्य हे मर्यादित लोकांनाच माहीत असते, विद्यार्थी दशेतील मुलांना या संतांबद्दल पाठ्यपुस्तकाशिवाय फारशी माहिती नसते, त्यांना या संताच्या शिकवणीची व कार्याची माहिती व्हावी यासाठी सत्यजित कदम फाउंडेशन व मैत्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने संतकथा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये एक संताची माहिती व कार्याबद्दल एक ऑनलाईन प्रश्न मंजूषा आयोजित करण्यात आली होती, आजचे विद्यार्थी हे उद्याची भावी पिढी आहे त्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा वारसा, परंपरा, इतिहास व संताची माहिती असणे व ती माहिती जतन करून ठेवणे ही काळजी गरज आहे असे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम श्री. छ. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संत कथा २०२२ या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभात बोलतांना म्हणाले.
सत्यजित कदम फाउंडेशन व मैत्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने संतकथा 2022 ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा राबवली गेली होती. यामध्ये ६ ते १० आणि ११ ते १४ असे दोन वयोगट करण्यात आले होते, या स्पर्धेत राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात १२२३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री. छ. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एकूण १७५ विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते या सर्व विद्यार्थ्यांना सहभागीतेबद्दल व उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तिपत्रक देण्यात आले, या दोन्ही वयोगटा मध्ये प्रत्येकी ६ क्रमांक निवडण्यात आले , ६ ते १० वयोगटात आदित्य संजय खांदे याने प्रथम क्रमांक पटकविला तर द्वितीय आयेश इम्रानबेग इनामदार, तृतीय सेहेर शेहबाज शेख, चतुर्थ नील शशिकांत खामकर, पंचम साद शंकिल तांबोळी, षष्ट सौम्य रवींद्र भोरे आणि ११ ते १४ वयोगटातील गटात प्रथम क्रमांक सारिका मंगेश निद्रे हिने पटकाविला तर द्वितीय शिवतेज रवींद्र गाडे, तृतीय सात्विक दत्तकूमार चौधरी, चतुर्थ सोहम किरण जगताप, पंचम अनुष्का बाळासाहेब हारदे आणि षष्ट अनुष्का मुकुंद वेदपाठक यांनी क्रमांक पटकाविले यासर्व विजेत्या विद्यार्थ्यांना माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले, यास्पर्धेत शिवाजी प्राथमिक विद्यालय तसेच हायस्कूल, डी. पॉल. इंग्लिश मीडियम, न्यू इंग्लिश स्कूल राहुरी फॅक्टरी, तसेच नंदकुमार पवार इंग्लिश मीडियम, संत ज्ञानेश्वर विद्यालय टाकळीमिया या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभागी झाली होती त्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या शाळेमध्ये जाऊन सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीने पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे व याच धर्तीवर आगामी काळात गणेश कथा चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सत्यजित कदम फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रशांत कोठूळे यांनी दिली, या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी कौतुक केले.
यावेळी श्री. छ. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चव्हाण सर, मुख्याध्यापक जाधव सर, मुख्याध्यापिका आवारी मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षिका, शाळेचे सर्व विद्यार्थी, माजी नगरसेवक सचिन ढुस, सत्यजित कदम फाउंडेशन चे उपाध्यक्ष प्रशांत कोठुळे, रामेश्वर तोडमल, मंगेश ढुस आदि यावेळी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रायते सर व भांड सर यांनी तर आभारप्रदर्शन उपमुख्याध्यापक आल्हाट सर यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत