राहुरी(वेबटीम) महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मैदानावर मंगळवार २३ ऑगस्ट ते पासून ११ सप्टेंबर दरम्यान २१ दिवस भारतीय सैन्य दलाची अग्नीवीर ...
राहुरी(वेबटीम)
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मैदानावर मंगळवार २३ ऑगस्ट ते पासून ११ सप्टेंबर दरम्यान २१ दिवस भारतीय सैन्य दलाची अग्नीवीर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने
महात्मा फुले कृषी विद्यापीठाची दुग्धविकास प्रयोगशाळा प्रवेशद्वार ते डिग्रस फाटा दरम्यान नगर-मनमाड रस्त्यावरील तीन किलोमीटर अंतरात येत्या सोमवार पासून पुढील २१ दिवस एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मैदानावर मंगळवार (ता. २३) पासून ११ सप्टेंबर दरम्यान २१ दिवस भारतीय सैन्य दलाची अग्नीवीर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे व जिल्ह्यातून रोज ५ हजार पुरुष व स्त्री उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. प्रत्येकाच्या सोबत १नातेवाईक बरोबर आल्यास रोज १० हजार जणांची गर्दी उसळणार आहे. त्यांना थांबण्याची जागा नगर-मनमाड महामार्गालगत आहे.
भरतीचे उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांनी आणलेली वाहने पार्किंगची सुविधा नसल्याने नगर- मनमाड महामार्गावर कृषी विद्यापीठ परिसरात वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे, अहमदनगर वरून मनमाडच्या दिशेने दुग्धविकास प्रकल्प ते डिग्रस फाटा दरम्यान ३ किलोमीटर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. भरती प्रक्रिये दरम्यान २१ दिवस एकेरी वाहतूक व्यवस्था केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जारी केले आहेत.
भरती प्रक्रियेमुळे २१ दिवस विद्यापीठ परिसरात एकेरी वाहतूक असणार आहे. या काळात नागरिकांना प्रवास करताना थोड्या दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. परंतु नागरीक व वाहन धारकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत