सात्रळ(वेबटीम) :माळेवाडी -डुक्रेवाडी ची सध्याची स्मशान भूमी सुरत -हैदराबाद ग्रीन इकॉनॉमिक कॉरिडॉर रस्त्यात जाणार असल्याने माळेवाडी डुकरेवा...
सात्रळ(वेबटीम)
:माळेवाडी -डुक्रेवाडी ची सध्याची स्मशान भूमी सुरत -हैदराबाद ग्रीन इकॉनॉमिक कॉरिडॉर रस्त्यात जाणार असल्याने माळेवाडी डुकरेवाडीच्या रहिवाश्याना अंतविधी साठी जागेची अडचण होणार असल्याकारणाने सदर गावासाठी शासणाने पर्यायी नवीन स्मशान भूमी साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी चे मागणी जिल्हा भाजपा ओबीसी युवा मोर्चा चे चिटणीस बिपीन ताठे यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच सात्रळ सोनगाव धानोरे पंचक्रोशीतील नागरिकांच्या रेशन कार्ड, आधार कार्ड, 'डोल, श्रावण बाळ योजना, दिव्यांग साठीच्या सरकारी योजना साठीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी "सरकार आपल्या द्वारी "च्या अंतर्गत सात्रळ येथे महसूल शिबीर घेण्याची मागणी निवेदनाद्वारे महसूल मंत्र्याकडे केलीआहे. सात्रळ सोनगाव येथील कार्यक्रमासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील आले असता हे निवदेन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत