व्हॉटसएप व इतर सोशल मिडीया अँप वापरताना 'ही' काळजी घ्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

व्हॉटसएप व इतर सोशल मिडीया अँप वापरताना 'ही' काळजी घ्या

  राहुरी(वेबटीम) सोशल मीडियावर नागरिकांना वेगवेगळ्या बतावणी करून अथवा भिती दाखवून पैसे देण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे  प्रकार घडत असू...

 राहुरी(वेबटीम)



सोशल मीडियावर नागरिकांना वेगवेगळ्या बतावणी करून अथवा भिती दाखवून पैसे देण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे  प्रकार घडत असून याबाबत नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी आवाहन केले आहे.


 दराडे यांनी म्हंटले की,   सध्या नागरीकांना व्हॉटसएप व इतर सोशल मिडीया अँपवर मोबाईल क्रमांकावरुन अनोळखी महिला चॅटींग करुन त्यामध्ये Hi, Hello, How are you असे मेसेज करते. त्यानंतर ती महिला आपणास व्हिडीओ कॉल करण्यास सांगते किंवा ती स्वतः व्हिडीओ कॉल करते. व्हिडीओ कॉलमध्ये ती महिला स्वतःचे कपडे काढते आणि समोरच्या व्यक्तीस देखील कपडे काढण्यास सांगते. (महिलेचा व्हिडीओ हा प्रीरेकॉर्डेड असतो) त्यानंतर व्हिडीओ कॉलमध्ये ती महिला अश्लील चाळे करते. हा सर्व प्रकरण करीत असताना स्क्रिन रेकॉर्डींग केली जाते आणि त्याचा व्हीडीओ तयार करुन तो व्हिडीओ आपले मोबाईलवर पाठवीला जातो. तो व्हीडीओ आपले जवळचे नातेवाईक, मित्र यांना पाठवू अथवा सोशल मिडीयावर व्हायरल करु असे सांगुन आपणास पैशाची मागणी केली जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास तो अश्लील व्हिडीओ नातेवाईकांना, मित्रांना तसेच सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. आपण पैसे न दिल्यास तोतया सायबर क्राईम पोलीस ठाणे अधिकारी कार्यालयीन अधिकारी, मिडीया पत्रकार इत्यादी असल्याची बतावणी करुन आपणास भिती दाखवून पैसे देण्यासाठी प्रवृत्त केले जाते. असे प्रकार मोठया प्रमाणात वाढले आहेत.


तरी सर्व नागरीकांना विनंती आहे की, आपण आपल्या मोबाईलवर व्हॉटसएप, फेसबुक,मॅसेंजर यावरुन कोणत्याही अनोळखी नंबरवर चॅटींग करु नये किंवा त्याचे व्हीडीओ कॉल रिसीव्ह करु नयेत, अशा नंबरवरुन तो नंबर तात्काळ ब्लॉक लीस्टमध्ये टाकावा. तसेच अशी घटना आपल्यासोबत घडल्यास 1930 या हेल्पलाईनवर किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत