सात्रळ (वेबटीम) ग्रामीण भागात दर वर्षी गावात होणारा हरिनाम सप्ताह ही धार्मिक कार्यक्रमाची पर्वणीच असते. करोना आपत्ती मुळे गेली दोन वर...
सात्रळ (वेबटीम)
ग्रामीण भागात दर वर्षी गावात होणारा हरिनाम सप्ताह ही धार्मिक कार्यक्रमाची पर्वणीच असते. करोना आपत्ती मुळे गेली दोन वर्ष न झालेला हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या वर्षी सहभाग अभावी बंद पाडण्याचे चिन्ह दिसत असताना सात्रळ येथील युवकांनी एकत्र येत अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेऊन अत्यन्त शिस्तबद्ध पद्धतीने हरीनाम सप्ताह साजरा करत आहेत.
विशेष बाब म्हणजे या युवकांना या विषयी कोणताही अनुभव नसताना हार्दिक नामस्मरण सप्ताह साजरा होत असलेने ग्रामस्थ युवकांचे कौतुक करतानाचे चित्र सर्वत्र आढळून येत आहे. पहाटे काकडा, सकाळी विष्णू सहस्त्र नाम व ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी प्रवचन, संध्याकाळी हरिपाट तर रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत नामवंत किर्तनकारांचे कीर्तन त्यानंतर त्याच सभागृहात दररोज महाप्रसाद असे शिस्तबद्ध कार्यक्रम होत आहेत. ग्रामीण भाग असल्याने वाड्या वस्त्या वर असलेली बिबटांची भीति या मुळे या पूर्वी रात्री उशिरा असलेल्या कीर्तनास भाविकांची उपस्तीथी कमी असायची पण युवकांनी अभिनव असा संध्याकाळी सात ते नऊ वा. पर्यन्त कीर्तन सोहळा व त्यानंतर अन्नदात्यांतर्फे महाप्रसाद या सकंल्पनेला उदंड प्रतिसाद मिळाला असून दररोज सदाहरणतः 600 ते 700 भाविक कीर्तन तसेच महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. युवकांचा वाढता सहभाग, योग्य पद्दतीने नियोजन, वाढलेली भाविकांची संख्या पाहून अनेक ग्रामस्थ तसेच भाविकांनी पुढील वर्षीच्या सप्ताहात आताच महाप्रसाद पंगतीची मागणी करत आहेत. युवकांचे हरिनाम सप्ताहतील मिळालेले यश पाहून अनेक जेष्ठ भाविक स्वतः होऊन यात मार्गदर्शन करत असल्याचे दिसत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत