देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे उद्या गुरुवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता DMC दूध संकलन व शीतकरण केंद्राचा भू...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे उद्या गुरुवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता DMC दूध संकलन व शीतकरण केंद्राचा भूमिपूजन सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती DMC उद्योग समूहाचे अध्यक्ष अजित चव्हाण यांनी दिली.
देवळाली प्रवरा येथील रेणुका पेट्रोल पंपा जवळ DMC दूध संकलन व शीतकरण केंद्राचा भूमिपूजन गुरुवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समूल डेअरी महाराष्ट्र राज्याचे व्यवस्थापक विवेकसिंग सर आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने शेतकरी मेळावा ही संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन DMC उद्योग समूहाचे अध्यक्ष अजित चव्हाण तसेच सर्व दुध उत्पादक शेतकरी व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत