सात्रळच्या उपसरपंचपदी बाळू वामन पवार यांची निवड. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळच्या उपसरपंचपदी बाळू वामन पवार यांची निवड.

सात्रळ(वेबटीम) सात्रळ ग्रामपंचायतीच्या  उपसरपंचपदाची  निवडणूक  नुकतीच  पर पडली असून उपसरपंच  पदी  जनसेवा  मंडळाचे बाळू वामन पवार यांची निवड ...

सात्रळ(वेबटीम)



सात्रळ ग्रामपंचायतीच्या  उपसरपंचपदाची  निवडणूक  नुकतीच  पर पडली असून उपसरपंच  पदी  जनसेवा  मंडळाचे बाळू वामन पवार यांची निवड झाली आहे.   


पंतप्रधान  नरेंद्रजी  मोदी  यांनी देशचे सर्वोच्च पद असलेल्या  राष्ट्रपती  पदी अनु. जमातीच्या  महिलेची निवड केल्याचा आदर्श  नजरेपुढे ठेवत  राज्याचे महसूल,  पशुसंवर्धन व  दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण  विखे पाटील यांचा सूचनेवरून  सात्रळ येथील जनसेवा मंडळाच्या  कार्यकर्त्यानी तसेच ग्रामपंचायत  सदस्यांनी एकमत करत बाळू पवार यांची उपसरपंच  पदी विराजमान  केले.  उपसरपंच  पवार यांच्या जनसेवा मंडळातर्फे    सत्कार प्रसंगी  विखे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  विश्वासराव  कडू यांनी हा विजय  कार्यकर्त्यांचा गट  तट  विसरून झालेल्या  एकोप्याचे श्रेय  असून गावाचा विकास करण्यासाठी  जनसेवा  मंडळ  कटिबद्ध  असल्याचे नमूद केले.


 या प्रसंगी  जनसेवा  मंडळाचे  जेष्ठ कार्यकर्ते  प्रतापराव कडू, जे. पी. जोर्वेकर, वसंतराव  डुक्रे, कारभारी ताठे, साहेबराव  नालकर,दिलीपराव  डुक्रे,  बाबुराव  पडघलमल, रमेश पन्हाळे,गोविंद  नागरे,  सात्रळ  चे सरपंच  सतिष ताठे, सदू भीमा पडघलमल, माजी उपसरपंच  तांबोळी, शिवाजी नालकर, गजानन शिंदे, जनसेवा मंडळाचेकोऑर्डिनेटर एम. बी. अंत्रे,  साळू पडघलमल, भाऊसाहेब रतन पडघलमल  तसेच ग्रामस्थ मोठया  संख्येने उपस्तिथ होते. निवड प्रक्रिया  सरपंच  सतिष ताठे यांच्या पीठासीन अध्यक्षतेनी पार  पडली, त्यांना सहाय्यक  पदी ग्राम विकास  अधिकारी  हैदरभाई पटेल यांना कमी पहिले तसेच निवडणूक दरम्यान  पोलीस नाईक देविदास  कोकाटे, होम गार्ड साकत, साळवे यांनी चोख  बंदोबस्त  ठेवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत