चिंचविहिरे येथे हर हर महादेव ग्रुप व राजुभाऊ शेटे मित्र मंडळ आयोजित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे येथे हर हर महादेव ग्रुप व राजुभाऊ शेटे मित्र मंडळ आयोजित

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे हर हर महादेव मित्र मंडळ व राजूभाऊ शेटे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे हर हर महादेव मित्र मंडळ व राजूभाऊ शेटे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.



नवरात्र निमित्तान श्री. क्षेत्र कोल्हापूर येथून प्रज्वलित करून चिंचवहिरे येथे आणलेल्या ज्योतीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.गेल्या चार दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम व खिचडी प्रसाद वाटपाचे हर हर महादेव मित्र मंडळ व राजूभाऊ शेटे मित्र मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात येत असून भाविक याचा लाभ घेत आहे.

दरम्यान आज गुरुवार २९ सप्टेंबर रोजी रात्री ठीक.९ ते ११ यावेळेत हभप पुजाताई (गणेश महाराज) गीते यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हर हर महादेव ग्रुप, राजूभाऊ शेटे मित्र मंडळ व योगेश नालकर मित्र परिवार यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत