करजगाव येथे कापूस वाण पीक पाहणी व चर्चासत्र संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

करजगाव येथे कापूस वाण पीक पाहणी व चर्चासत्र संपन्न

आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील अमृतवाहिनी प्रवरा माईच्या काठावर वसलेल्या करजगाव येथे चैतन्य ऍग्रो सर्व्हिसेस व सिकंदराबाद येथील अदिला ऍग्री...

आंबी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील अमृतवाहिनी प्रवरा माईच्या काठावर वसलेल्या करजगाव येथे चैतन्य ऍग्रो सर्व्हिसेस व सिकंदराबाद येथील अदिला ऍग्रीटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मोक्षा कापूस बियाणे या वाणावर पीक पाहणी व चर्चासत्र कार्यक्रम कुबेरेश्वर मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. 



      या कार्यक्रमास दहेगावने कापूस पीक तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्राचे विशेतज्ञ नारायण निबे यांनी पंचक्रोशीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बँक ऑफ बडोदा देवळाली प्रवरा शाखेचे शाखाधिकारी पांडुरंग डुकरे यांनी भूषवले. तर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गणेश अनारसे, कृषी सहायक संजय सोनवणे, अदिला ऍग्रीटेकचे रिजनल मॅनेजर केशव सोनवणे या मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

         याप्रसंगी प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब श्रीरंग कोतकर, बाबासाहेब हरिभाऊ कोतकर या शेतकऱ्यांच्या कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी लावलेल्या मोक्षा कापूस वाणाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कापूस पिकावर येणाऱ्या कीड प्रादुर्भाव, पाने गळती, कापुस बोंडातील सरकीचे प्रमाण, दोन झाडांमधील अंतर, कैऱ्यांची संख्या, अधिक उत्पन्न घेण्यासाठी खतांचे योग्य प्रमाण, फवारणी साठीची कीटकनाशक व बुरशीनाशक यांची फवारणी कशी करावी, औषधांचे प्रमाण किती असावे तसेच वंतेली, कांदा, ऊस, सोयाबीन, हरबरा या प्रमुख पिकांवर मार्गदर्शन केले.

    


   सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक हभप बापू महाराज कोतकर यांनी केले. कार्यक्रमासाठी करजगाव, जातप, ब्राम्हणगाव भांड, कोंढवड, बोधेगाव, लाख, त्रिंबकपूर येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार चैतन्य ऍग्रोचे सर्वेसर्वा संदिप गोरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत