भगर खाताय का? मग अन्न औषध प्रशासनाने केलेले हे आवाहन नक्की वाचा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भगर खाताय का? मग अन्न औषध प्रशासनाने केलेले हे आवाहन नक्की वाचा

  अहमदनगर(वेबटीम) उपवास म्हटला की उपवासाचे अनेक पदार्थ डोळ्यांसमोर येतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा याचबरोबर भगर हा पदार्थ देखील सर्रास व...

 अहमदनगर(वेबटीम)



उपवास म्हटला की उपवासाचे अनेक पदार्थ डोळ्यांसमोर येतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा याचबरोबर भगर हा पदार्थ देखील सर्रास वापरला जातो. शिवाय अनेक डायट करत असलेले नागरिक देखील नाश्त्याला भगरीला प्राधान्य देतात. मात्र काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत भगरमुळे विषबाधा झाल्याची घटना समोर आली. यानंतर भगर बाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत. नवरात्र सुरू यापूर्वीच भगर आणि उपवासाचे पदार्थ खाताना काय काळजी घ्यायची याबाबत अन्न औषध प्रशासन विभागाने माहिती पत्रक प्रसिद्ध केले आहे.


औषध प्रशासन विभागाने म्हंटले की, देशात तसेच महाराष्ट्र राज्यात सध्या नवरात्री उत्सव हा दिनांक २६.०९.२०२२ ते ०५.१०.२०२२ पर्यंत असल्याने भावीकांमार्फत श्रध्देचा भाग म्हणून उपवास ठेवण्यात येतो व उपवासाच्या काळात बऱ्याचदा भगरीचे सेवन मोठ्याप्रमाणात केल्या जाते. 

त्यामुळे खालील प्रमाणे काळजी घ्यावी


१. भगर व इतर पदार्थ खरेदी करतांना परवानाधारक/नोंदणी धारका कडुनच खरेदी करावेत.

२. पॅकबंद असलेले भगर/ उपवासाचे पदार्थच विकत घ्यावेत.

३. सदर पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बंच नंबर इत्यादी तपासून खरेदी करावेत.

४. पॅकेटवर प्रक्रीया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले याचे तपशील असतो तो निट पाहून घ्यावा. त्यासह "Best Before म्हणजे भगरीची अंतीम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते ते ही तपासुन व खात्री करुनच खरेदी करावी. 

५. भगरीचे सुटे पिठ खुल्या बाजारातुन हातगाडी वरून विकत घेवू नये. बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून व नंतर स्वच्छ धुवुन त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे.

६. खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडुन पक्के खरेदी बिल घ्यावे. 

७. भगर पिठापासुन तयार केलेली भाकरी हि परिपुर्ण भाजलेली आहे याची खात्री करुनच सेवन करावी.

८. सकाळी बनविलेली भगर संध्याकाळी / रात्री शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करण्यात येवू नये. 

९.भगर व इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत व ते तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करण्यात यावा.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत