अहमदनगर(वेबटीम) श्रीगोंदा तालुक्यातील मौजे अजनुज (आनंदवाडी) येथील ११ वर्षीय विद्यार्थ्यास स्विफ्ट डिझायर गाडीतूल पळवून नेण्याचा दोघांनी प्रय...
अहमदनगर(वेबटीम)
श्रीगोंदा तालुक्यातील मौजे अजनुज (आनंदवाडी) येथील ११ वर्षीय विद्यार्थ्यास स्विफ्ट डिझायर गाडीतूल पळवून नेण्याचा दोघांनी प्रयत्न केला.
विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवत स्वताची सुटका करून घेतली.माहिती मिळताच ग्रामस्थांनी गाडी पकडून दोघांना बेदम चोप दिल्याची घटना आज घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथील समर्थ गणेश यादव (वय वर्षे ११) हा रयत शिक्षण संस्थेच्या काष्टीमधील जनता विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे.
बुधवार २८ सप्टेंबर रोजी शाळेमध्ये सकाळी ९:३० वाजता चित्रकला स्पर्धा असल्याने शाळा लवकर सुटली. त्यानंतर त्याने यशोदा क्लासमध्ये एक तास पूर्ण केला आणि घरी जाण्यासाठी अजनुज चौकात येऊन थांबला. तिथे बिना नंबरची स्विफ्ट डिझायर गाडी येऊन थांबली. गाडीत असलेल्या नासिर गुलाब पठाण याने तुला कुठे जायचे आहे? असे समर्थला विचारले.
आम्ही तुझ्या पप्पांचे मित्र आहोत असे सांगत, त्याला गाडीत बसविले. त्यांनतर त्यांनी अनोळखी दोघांना गाडीत बसवून गणेशा व माळवाडी येथे सोडले. मला पुढे घेऊन जात असताना खरातवाडी येथे गाडी आल्यावर हरिभाऊ दत्तू वाळुंज याने गाडीत असलेला चाकू दाखवला. आरडा ओरडा केला तर, चाकू पोटात खुपसून टाकेल असा सज्जड दम दिला.
त्यानंतर पुढे रस्त्यावर मोठा खड्डा आल्याने गाडीचा स्पिड कमी झाला. नंतर तात्काळ समर्थ यादव याने गाडीतून उडी टाकली आणि रस्त्या लगत असलेल्या अशोक वाघमोडे यांच्या घरी गेला. त्यांना माझ्या वडिलांना फोन करा असे सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत