गुप्तधनाच्या हव्यासापोटी बेलापुरात स्फोट घडवून माय-लेकीचा खून! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुप्तधनाच्या हव्यासापोटी बेलापुरात स्फोट घडवून माय-लेकीचा खून!

राहुरी(वेबटीम) बेलापूर बुद्रूक येथे राहणारी विवाहित महिला ज्योती शशीकांत शेलार व तिची लहान मुलगी नमोश्री शशीकांत शेलार (वय ९) या माय- लेकींच...

राहुरी(वेबटीम)



बेलापूर बुद्रूक येथे राहणारी विवाहित महिला ज्योती शशीकांत शेलार व तिची लहान मुलगी नमोश्री शशीकांत शेलार (वय ९) या माय- लेकींचा गुप्त धनासाठी स्फोट घडवून खून केल्याची घटना समोर आली आहे. मयत ज्योतीचा पती व दोन भोंदू बाबांसह १२ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बेलापूरसह श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.


घटनेवेळी पोलिसांना चुकीची माहिती सांगून तपासाची दिशा भरकटवली होती असा त्यावेळी आरोप झाला होता. काल श्रीरामपूर शहर पोलीसात मयत महिलेचे भाऊ राजेंद्र  कचरू नन्नवरे (रा. पिंपळाचा मळा, राहुरी) यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी शशीकांत अशोक शेलार, अशोक ठकाजी शेलार, लीलाबाई अशोक शेलार, बाळासाहेब अशोक शेलार, कविता बाळासाहेब शेलार, पवन बाळासाहेब शेलार (रा, बेलापूर), काजल किशोर खरात, किशोर सुखदेव खरात, अनिकेत पाटोळे (रा. कोल्हार), गागरे बाबा, सांगळे बाबा, देवकर गुरु यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी संगनमत करून गुप्त धनाच्या लालसेपोटी गॅस गळतीचा स्फोट घडवून आणला. हा अपघाती मृत्यु नसून सर्व प्रकार गुप्त धनासाठी खून केल्याचा आहे. घटना घडवून आणली, पुराव्याची विल्हेवाट लावली असून कोर्ट आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. गवळी पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत