राहुरी(वेबटीम) साई आदर्श मल्टीस्टेट या पतसंस्थेस गणपती पुळे येथे संपन्न झालेल्या पतसंस्था सहकार परिषद 2022 या राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्...
राहुरी(वेबटीम)
साई आदर्श मल्टीस्टेट या पतसंस्थेस गणपती पुळे येथे संपन्न झालेल्या पतसंस्था सहकार परिषद 2022 या राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार 2022 चे वितरण राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रात संस्थांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहन मिळावे या हेतूने महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी साई आदर्श मल्टीस्टेटने सादर केलेल्या माहितीच्या आधारे निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार मल्टीस्टेट पतसंस्था विभागांमध्ये दिपस्तंभ पतसंस्था पुरस्कारासाठी साई आदर्श मल्टीस्टेटची निवड करण्यात आली. सर्वांचे हित जोपासणारी संस्था असा आपला एक वेगळा ठसा निर्माण करत इतरांना आदर्शवत व्हावे, असे काम करून दाखविल्यानेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. असे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांनी सांगितले .
साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे म्हणाले हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी गेल्या नऊ वर्षापासून आम्ही अविरतपणे झटत आहोत. ठेवीदारांचा विश्वास जिंकत आम्ही यशस्वी ठरलो त्याचा आम्हाला अभिमान आहे. या यशामध्ये संचालक मंडळ कर्मचारी व कलेक्शन एजंट यांचेही सहकार्य लाभले आहेत सभासद ठेवीदार खातेदार यांनी मोठा विश्वास आमच्यावर टाकला आहे. त्यास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढेही संस्था आणखी झपाट्याने प्रगती करेल असे त्यांनी सांगितले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे राजुदास जाधव, डॉ शांतीलाल शिंगी, सुदर्शन भालेराव, सुरेखाताई लवांडे, संस्थेचे संचालक बाळासाहेब तांबे, विलास पाटील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत