जनावरांतील लंम्पि आजाराला गोपालकांनी घाबरून जाऊ नये :डॉ. पोपटराव दिघे यांचे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जनावरांतील लंम्पि आजाराला गोपालकांनी घाबरून जाऊ नये :डॉ. पोपटराव दिघे यांचे आवाहन

सात्रळ(वेबटीम) राज्यात  सद्या पशुपालकांना भेडसावत असणाऱ्या लंम्पि  आजारास गोपालकांनी घाबरून न जाता योग्य  पद्धतीने उपचार तसेच जनावरांची काळज...

सात्रळ(वेबटीम)



राज्यात  सद्या पशुपालकांना भेडसावत असणाऱ्या लंम्पि  आजारास गोपालकांनी घाबरून न जाता योग्य  पद्धतीने उपचार तसेच जनावरांची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे आवाहन  परिसरातील  जेष्ठ पशुवैद्य  डॉ.. पोपटराव  दिघे यांनी धानोरे येथील दिघे वस्ती  जि. प. प्राथमिक  शाळेत झालेल्या  दुध उत्पादक  शेतकरी तसेच विद्यार्थी  मार्गदर्शन  मेळाव्यात  केले. 


या मार्गदर्शनपर  आवाहनात  त्यांनी  लंम्पि रोगाचे  प्राथमिक  लक्षणे, त्यावरील उपचार  तसेच बाधित जनावरांची काळजी कशी घ्यावी यावर  पशुपालकांच्या दृष्टीने  महत्वाचे  असे मार्गदर्शन  केले. तसेच सात्रळ सोनगाव  धानोरे पंचक्रोशीच्यावतीने राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व  दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण  विखे पाटील यांचे लंम्पि आजाराच्या संरक्षण  साठी राज्यात  मोफत लसीकरण  योजना  राबविल्याबद्दल  आभार  मानले. 



या मार्गदर्शन शिबिरासाठी धानोरे परिसरातील  पशुपालक, दूधउत्पादक शेतकरी  तसेच विधार्थी पालक, जि. प. प्रा. शाळेचे  शिक्षक  वर्ग उपस्तिथ होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत