देवळाली प्रवरातील ' या' भागात पुरुष जातीचा मृतदेह आढळला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील ' या' भागात पुरुष जातीचा मृतदेह आढळला

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरातील खांदे-वाळूंज वस्ती येथील नाग ओढ्यात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरातील खांदे-वाळूंज वस्ती येथील नाग ओढ्यात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे.




  मुसळधार पावसाने ओढे-नाले तुडूंब भरून वाहत असून आज दुपारी नाग ओढ्यात अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत माजी उपनगराध्यक्ष कारभारी वाळुंज, शरद सुखदेव खांदे यांना दिसून आला.



 त्यानंतर त्यांनी तातडीने राहुरी पोलीस ठाण्यास ही माहिती दिली. 


घटनास्थळी देवळाली आउट पोस्टचे पोलीस कर्मचारी श्री.भिताडे, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे, सामाजिक कार्यकर्ते मयूर कदम यांनी धाव घेतली. सदर मृतदेह पाण्यातुन बाहेर काढण्याचे काम सुरू होते.



 सदर मृतदेह ३५ ते ४० वर्षीय पुरुष जातीचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत