राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे गटात राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराजे देसाई यांचे हस्ते आणि शिर्डी लोक...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी )
मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे गटात राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराजे देसाई यांचे हस्ते आणि शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ राजाभाऊ लांडगे यांनी जाहिर प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव शहर प्रमुख दिलीप सातपुते बाबुशेठ टायरवाले सुभाष लोंढे मदन आढाव संग्राम शेळके तालुकाप्रमुख बंडू रोहकले, नंदकुमार ताडे, कैलास माने विष्णुपंत ढाकणे ,अभिषेक डहाळे, सुनील लालबोंद्रे ,रवींद्र लालबोंद्रे ,संजय छजलाणी प्रशांत डावरे ,प्रकाश फुलारी यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
नगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांचा मेळावा मंत्री ना. शंभूराजे देसाई शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात अनेक जुने आणि नवीन समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे गटात स्वयंस्फूर्तीने उदंड प्रतिसाद देत प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व राज्याला लाभले आहे. आतापर्यंतच्या सामाजिक जीवनात केलेल्या कामानेच मुख्यमंत्री शिंदे गटात काम करण्याची संधी मिळालेचे आमचे प्रतिनिधिंशी बोलताना राजेंद्र लांडगेनीं शेवटी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत