देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील साई समृद्धी बचत गटाच्यावतीने दिवाळीनिमित्त सभासदांना रिबीट व मिठाई वाटप करण्यात आले. देवळाली...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील साई समृद्धी बचत गटाच्यावतीने दिवाळीनिमित्त सभासदांना रिबीट व मिठाई वाटप करण्यात आले.
देवळाली शहरातील टाकळीमिया रोड व परिसरातील छोट-मोठ्या व्यासायिकांनी मिळून गेल्या ३ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या साई समृद्धी पुरुष बचत गटाच्या सभासदांना रिबीट व मिठाई वाटप हॉटेल गावकरी थाट येथे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सुदर्शन जवळ, सुनील गोसावी, उदय इंगळे, बँक ऑफ बडोद्याचे सुशील सरकटे , मनोज शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल श्री.ढाकणे, विजय मुसमाडे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्तविक बचत गटाचे अध्यक्ष संजय मुसमाडे यांनी प्रास्तविकात बचत गटाच्या माध्यमातून सुरू कामाची माहिती देव नगरपालिका व बँक ऑफ बडोद्या माध्यमातून नेहमी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले.
यावेळी सौ.सुजाता मुसमाडे, अतुल उगले, दुर्गादास भोसले, लक्ष्मण म्हस्के, अशोक शेंडगे, अल्ताफ शेख, अनिस शेख, राजेंद्र सोनवणे, बाबासाहेब मुसमाडे, सोमनाथ बर्डे, साईनाथ रणधीर , आदीनाथ मुसमाडे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत