डॉ.दादासाहेब तनपुरे कृषी फलोत्पादन प्रक्रिया सह संस्थेचा लाभांश वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ.दादासाहेब तनपुरे कृषी फलोत्पादन प्रक्रिया सह संस्थेचा लाभांश वाटप

राहुरी(वेबटीम) राहुरी येथील डॉ.दादासाहेब तनपुरे कृषी फलोत्पादन प्रक्रिया सह.संस्था मर्या ,राहुरी  या  संस्थेचा लाभांश वाटप मा.खा प्रसाद तनपु...

राहुरी(वेबटीम)



राहुरी येथील डॉ.दादासाहेब तनपुरे कृषी फलोत्पादन प्रक्रिया सह.संस्था मर्या ,राहुरी  या  संस्थेचा लाभांश वाटप मा.खा प्रसाद तनपुरे यांचे हस्ते नुकताच संपन्न झाला.


 यावेळी माहिती देतांना संस्थेचे चेअरमन संतोष ताराचंद तनपुरे यांनी सांगितले की, या संस्थेचे भागभांडवल 2 लाख 90 हजार असुन  संस्थेने सन 21-22 या सालात रासायनिक खतांची रु.9 लाख 76 हजार 116 रुपयांची विक्रमी विक्री केली असुन बियाणे विक्री 18 हजार झालेली आहे. सन 22 अखेर संस्थेला 1 लाख 29 हजार 223 रुपयांचा निव्वळ नफा झालेला आहे. या वर्षी संस्थेने 12 टक्के लाभांश वाटप केलेला आहे. रासायनिक खतांच्या विक्रीमध्ये डॉ.दादासाहेब तनपुरे फलोत्पादन संस्था जिल्हात एक नंबर ठरल्याने नुकताच महाराष्ट्र स्टेट को-आँप फेडरेशन मुंबई ने त्यांना सन्मानित केले होते. मा.खा प्रसाद तनपुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार प्रगतीच्या दिशेने चालु असुन संस्थेची स्वमालीकीची इमारत ,व्यापारी संकुल ,रासायनिक खत डेपो ,बियाणे विक्री विभाग आदि उपन्नाचे साधने कार्यरत आहे. 

लांभाश वाटप कार्यक्रमात प्रातिनीधीक स्वरुपात संस्थेचे सभासद बाळासाहेब काळे,बाबा सोनवणे ,सचिन शिंदे ,बाबा कल्हापुरे ,सचिन गुमास्ते,बाळासाहेब कराळे,शरद तनपुरे आदिंना लाभांश वाटप करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन संतोष तनपुरे ,व्हा.चेअरमन गोरक्षनाथ खडके,संचालक प्रभाकर पानसंबळ  मँनेजर नामदेव काळे ,दत्तात्रय नलगे आदि उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत