राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रहिवासी आप्पासाहेब भीमराज ढुस व मुलगा प्रसाद आप्पासाहेब ढुस यांच्यावर राहु...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रहिवासी आप्पासाहेब भीमराज ढुस व मुलगा प्रसाद आप्पासाहेब ढुस यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ करून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डिग्रस येथील दत्ता सोपान पटेकर(वय-४३, बांधकाम व्यवसाय) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हंटले की, मी आप्पासाहेब ढुस यांच्याकडे त्यांच्या बंगल्याच्या बांधकामाचे मजुरीचे पैसे मागितले असता त्याचा राग आल्याने ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता आप्पासाहेब भीमराज ढुस व प्रसाद आप्पासाहेब ढुस यांनी लाथाबुक्क्याने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच कट्ट्याने गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान दत्ता पटेकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आप्पासाहेब ढुस व प्रसाद ढुस या दोघांवर गु.रजि.नं. व कलम - I 985/2022 भादवी कलम323,504,506अ.जा.ज.कायदा कलम 3(1)(r)(s) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा आधिक तपास श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके तपास करीत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत