सात्रळ/वेबटीम:- येथील पंचक्रोशी येथील हनुमंतगांव तसेच पाथरे बु ll गावांमध्ये महसूल विभागाच्या आवाहनानुसार ई पीक पाहणी व नोंदणी मो...
सात्रळ/वेबटीम:-
येथील पंचक्रोशी येथील हनुमंतगांव तसेच पाथरे बु ll गावांमध्ये महसूल विभागाच्या आवाहनानुसार ई पीक पाहणी व नोंदणी मोहीम पाथरे सज्जाचे तलाठी ठाकरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतली आहे. शासनाच्या महसूल विभागाच्या सूचनेनुसार या पुढील काळात शासन स्तरावर ई पीक पंचनामे ऑनलाईन पद्धतीने होणार असून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे याच पद्धतीने होणार आहेत. परिसरातील शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणीस अल्प प्रतिसाद दिसत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या नुकसान झालेल्या पिकाचा मोबदला मिळण्यासाठी गरजेची असलेली ई पीक पाहणी मोहीम प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांदावर जाऊन ई पीक पाहणी करण्याची व नोंद करण्याच्या या मोहिमेचे बळीराजा कडून कौतुक होत आहे. ई पीक पाहणी नोंद करताना बरेच वेळेस सरकारची या पाहणीचे संकेत स्थळ बंद पडत असल्याने महसूल कर्मचार्याना या मोहिमेत अडचण येत असल्याचे चित्र आढळत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत