राहुरी(वेबटीम) निर्मलाताई काकडे माध्यमिक आश्रमशाळा मंगरूळ खुर्द येथे कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचा 44 वा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम मा. ...
राहुरी(वेबटीम)
निर्मलाताई काकडे माध्यमिक आश्रमशाळा मंगरूळ खुर्द येथे कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचा 44 वा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम मा. श्री. अर्जुनराव पा. झिरपे चेअरमन वि. का. से. सोसायटी मंगरूळ बुll यांच्या अध्यक्षतेखाली व मा. डॉ. निवृत्ती राठोड( माजी विद्यार्थी ) मा. ऍड. संजयराव काकडे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय सूचना मा. प्रा. अनिल जगताप यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मयोगी आबासाहेब काकडे आणि स्व. निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमाचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी वक्तृत्व, सामान्यज्ञान, रांगोळी, चित्रकला,कुस्ती, खो खो, इत्यादी स्पर्धामध्ये गुणवंत विद्यार्थी यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर उबाळे यांनी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
केदारेश्वर साखर कारखान्याचे संचालक मा. श्री.नवनाथ ढाकणे यांनी आबासाहेब हे एक अतुलनीय त्यागाचे मूर्तिमंत प्रेरणास्रोत आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे डॉ. निवृत्ती राठोड यांनी आबासाहेब काकडे म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचासरणी याचे उदाहरण होय. त्यांच्या जीवनावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गाडगे महाराज यांच्या विचाराचा प्रभाव पडलेला दिसतो. आबासाहेब यांच्या कार्यामुळेच आज आम्ही शिक्षण घेऊन चांगल्या पदापर्यंत जाऊ शकलो असे विचार व्यक्त केले.डॉ. निवृती राठोड सहकुटुंब या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे भोजन दिले आणि आश्रमशाळेसाठी देणगी दिली.संत सेवालाल प्राथमिक आश्रमशाळेचे सेवानिवृत्त महिला कर्मचारी श्रीम. संगीता मानसिंग चव्हाण आणि श्री. तुळशीराम राठोड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कु. भक्ती माणिक केदार हिने आबासाहेबाविषयी विचार व्यक्त केले.या कर्यक्रमाच्या वेळी श्री. शेलार सर यांची कन्या कु. धनश्री हिने आबासाहेबांची रेखाटलेली अतिशय सुंदर अशी प्रतिमा शाळेसाठी भेट दिली.
या कार्यक्रमासाठी मा. संजयराव काकडे,मा. रामेश्वर पालवे वसतिगृह विभाग प्रमुख, मा. मा. भारत कापसे , मा मनोहर झिरपे, मा. सूर्यकांत केदार मेजर, मा. रामकिसन सांगळे, मा. लक्ष्मण कदम, मा.एकनाथ कसाळ पाटील, मा.विक्रम पा.काकडे, मा. आसाराम ढाकणे, आदिनाथ विघ्ने सर,हसनापूर, कोळगाव, मंगरूळ खुर्द, मंगरूळ बु, आंतरवाली खुर्द, आंतरवाली बु येथील ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. जयश्री लवांडे यांनी केले. आभार श्री. ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत