राहुरी(वेबटीम) वृद्ध आश्रमात वाढदिवस साजरा करून आरपीआयचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली असल्...
राहुरी(वेबटीम)
वृद्ध आश्रमात वाढदिवस साजरा करून आरपीआयचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांचे खंदे समर्थक तथा आरपीआय राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांचा वाढदिवस गुरुवारी श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रम येथे पार पडला प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी संदीप मिटके बोलत होते.
यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,पुणे येथील विधिज्ञ विकास वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी डीवायएसपी मिटके यांनी प्रदीप मकासरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मकासरे यांच्या वतीने वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले.या कार्यक्रमास आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे,उत्तर नगर जिल्हा युवक अध्यक्ष रॉकी लोंढे, माऊली वृद्धाश्रमचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वाघूनडें, गोविंद कांदे, अमोल शेळके, सचिन चक्रनारायण, गणेश बकरे आदींसह मित्र परिवार तसेच आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत