राहुरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील जातप येथे बिबिट्याचे हल्ल्यात जखमी झालेल्या मयुर बोंबले यांच्या कुटूंबियांची आज श्रीरामपूर विधानसभा ...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील जातप येथे बिबिट्याचे हल्ल्यात जखमी झालेल्या मयुर बोंबले यांच्या कुटूंबियांची आज श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली.
जखमी मयूर बोंबले यांच्यावर सिव्हिल हॅास्पीटलमध्ये व्यवस्थित उपचार न झाल्याने त्यास नगरमधील खासगी हॅास्पीटलमध्ये दाखल केले आहे.
उपचाराचा प्रचंड खर्च येत असुन त्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची असुन मदत मिळावी म्हणुन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, वनाधिकारी यांना फोन करुन तात्काळ सहकार्य करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी दत्ता कडु तसेच गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत