राहुरी फॅक्टरीतील आदर्श पतसंस्थेच्या वतीने बुधवारी उद्योजक जगदीश कदम यांचा सन्मान सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील आदर्श पतसंस्थेच्या वतीने बुधवारी उद्योजक जगदीश कदम यांचा सन्मान सोहळा

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्यावतीने देवळाली प्रवरा शहराचे भूमिपुत्र, दौंड शुगरचे चेअरमन  प्रसिद्ध बां...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्यावतीने देवळाली प्रवरा शहराचे भूमिपुत्र, दौंड शुगरचे चेअरमन  प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जगदीश कदम यांचा मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी दीपावली पाडव्याच्या दिवशी सकाळी ११ वाजता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र जगदीश कदम यांच्या राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या १०८ तासात अमरावती ते अकोले ७५ की.मी.चा रस्ता पूर्ण केल्याबद्दल व या कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल आदर्श पतसंस्थेच्यावतीने संस्थेच्या राहुरी फॅक्टरी येथील मुख्य कार्यालयात २६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वा.श्री कदम यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.


तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन आण्णासाहेब चोथे, व्हा. चेअरमन प्रा.सुधाकर कदम सर्व संचालक मंडळ व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत