करजगाव येथे दूध उत्पादकांना अनामत रकमेचे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

करजगाव येथे दूध उत्पादकांना अनामत रकमेचे वाटप

  आंबी/वेबटीम:-   राहुरी तालुक्यातील कृषी क्षेत्रात सधन असलेल्या करजगाव येथे साई दूध संकलन केंद्र व कर्जतेश्वर दूध उत्पादक संस्थेच्या संयुक्...

 आंबी/वेबटीम:-

 राहुरी तालुक्यातील कृषी क्षेत्रात सधन असलेल्या करजगाव येथे साई दूध संकलन केंद्र व कर्जतेश्वर दूध उत्पादक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी निमित्त अनामत रक्कम वाटप व विक्रमी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ ग्रामदैवत कुबेरेश्वरांच्या आशीर्वादाने पार पडला.


   प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. यावेळी साई दूध संकलन केंद्राचे कर्मचाऱ्यांना बोनस आणि पाचीपोषाख देऊन दिवाळी गोड करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदेगाव जिल्हा बँक शाखेचे शाखाधिकारी श्री. कोळसे हे होते. तर बडोदा बँकेचे कृषी विभाग अधिकारी श्री. सुरज, चांदेगाव जिल्हा बँक शाखेचे श्री. आंबेकर,  बाबासाहेब कोतकर, सागर टेकाळे, वल्लभ दायमा  अनिल टेकाळे ,सोपान नरसाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.


 यावेळी चेयरमन नानासाहेब श्रीरंग कोतकर यांच्या हस्ते विक्रमी दूध पुरवठा करणारे जावेद पठाण , नानासाहेब कोतकर, बाळासाहेब काळे, सुनिल कोतकर, सुखदेव काळे, गणेश काळे यांना अनामत रक्कम आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, संस्थेचे सदस्य, दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चेअरमन नानासाहेब श्रीरंग कोतकर आणि जावेद बालम पठाण यांनी संस्थेच्या स्थापनेपासून तर आजपावेतो केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत, आर्मी व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत, दुभती जनावरे खरेदी, ना नफा ना तोटा तत्वावर पशु आहार वितरण आदी शेतकरी उपयोगी उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमासाठी करजगाव, ब्राम्हणगाव भांड, जातप, बेलापूर, लाख येथील नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते. 


  सूत्रसंचालन युवानेते जावेद बालम पठाण तर आभार बाभळेश्वर संघाचे संचाकल बाळासाहेब कोतकर यांनी मांडले




 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत