देवळाली प्रवरात साई मंदिराचे काम प्रगतीपथावर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात साई मंदिराचे काम प्रगतीपथावर

    राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठाणच्यावतीने शहरातील शनी मंदिर लगत श्री.साईबाबा मंदिर उभारणीचे काम  सु...

  राहुरी(वेबटीम)


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठाणच्यावतीने शहरातील शनी मंदिर लगत श्री.साईबाबा मंदिर उभारणीचे काम  सुरू केले असून लवकरच मंदिर पूर्णत्वाकडे जाणार समाजातील दानशूर मंडळी व साई भक्तांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन साई प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले.



साई प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी देवळाली प्रवरा बाजारतळ येथे साई पारायण सोहळा आयोजित केला जातो. या निमित्ताने कीर्तन महोत्सव, अन्नदान आदि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येते. 



साई प्रतिष्ठानशी असंख्य साई भक्त जोडले गेले असल्याने देवळाली प्रवरात साई मंदिर व्हावे अशी भाविकांची व साई प्रतिष्ठनच्या सदस्यांची इच्छा होते.



 त्यानुसार साई प्रतिष्ठानने देवळाली शहरातील शनी मंदिर लगत भव्य-दिव्य साई मंदिर उभारणीचे काम हाती घेतले त्यानुसार  मंदिराचे जवळपास ६० टक्के पूर्ण झाले आहे. या कामासाठी देवळाली प्रवरातील दानशूर मंडळी, साई भक्त, सर्व धर्मीय समाज बांधव यांची मदत मिळत आहे. 



अद्यापही मंदिरातील इतर कामासाठी मदतीची गरज असून आर्थिक व बांधकाम वस्तू स्वरुपात मदत करावी तसेच देवळाली प्रवरा माहेर असलेल्या कन्यांना देवळाली गावात साई मंदिराच्या कळसाचे काम सुरु आहे या कामासाठी आपला सहभाग अत्यंत मोलाचा असल्याने स्वइच्छेने दान करावे असे आवाहन साई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत