परतीच्या पावसाने आंबी परिसरात अतोनात नुकसान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

परतीच्या पावसाने आंबी परिसरात अतोनात नुकसान

आंबी (वेबटीम):- परतीच्या मुसळधार पावसाने राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील आंबी, अंमळनेर, दवणगांव, केसापूर या गावात खरीप पिकाचे अतोनात नुकस...

आंबी (वेबटीम):-



परतीच्या मुसळधार पावसाने राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील आंबी, अंमळनेर, दवणगांव, केसापूर या गावात खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. 



त्यामुळे सदरील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर डोक्याला हाथ लावण्याची वेळ आली.



  या परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला कापूस, सोयाबीन आदि खरीपाच्या पिकासह पालेभाज्या, जनावरांच्या हिराव्या चारा असलेल्या शेतात पाणी साचल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आंबी-अंमळनेर गावच्या वरच्या पट्ट्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सुधाकर सालबंदे, कडूभाई इनामदार, अप्पासाहेब जाधव, अॅड. विठ्ठल कोबरणे, रामनारायण जाधव यांच्या रहात्या घरात पाणी घुसल्याने जीव मुठीत धरून त्यांना रात्र जागून काढावी लागली. अंमळनेर गावठाण मध्ये या मुसळधार पावसाने राजेंद्र ढोलक यांची रहात्या घरांची भिंत कोसळली. 



ती शेजारी रहात असलेले विठठल धाकतोडे यांच्या घरावर दोघांच्याही  घराचे नुकसान झाले.

    अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा प्रधान मंत्री पीक विमा उतरला आहे. पिकांचे अतोनात नुकसान शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी  केल्या आहे. संबधीत अधिकाऱ्यांनी बाधीत पिकांचे पंचनामे सुद्धा केले आहे.



 मात्र  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये रक्कम का जमा झाली नाही? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे जेष्ट नेते माजी सरपंच सतिष जाधव, सोसायटीचे माजी चेअरमन तात्यासाहेब कोळसे, रावसाहेब सालबंदे, रंगनाथ साळुंके, बाबा लोढे, दत्तात्रय कोळसे, अच्युतराव जाधव, अँड. विठ्ठल कोबरणे, जेष्ट पत्रकार विश्वनाथ जाधव यांसह आदी शेतकऱ्यांनी केला आहे. तिन वर्षांपासून शेतकरी पीकविमा उतरवितात. परंतू विम्याची रक्कम कंपनी कडून येत नाही. त्यामुळे विमा कंपनीचे लाखो रुपये जमा करून बळीराजाला फसविण्याचे हे षडयंत्र तर नाही ना? असा प्रश्न उपस्थीत होत आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांची तटपुंजी विम्याची रककम देऊन शेतकऱ्यांच्या जमखमेवर मीठ चोळू नये. अन्यथा ग्राहक मंचाकडे तक्रार कडून दाद मागू अशी उद्विग्न भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत