देवळाली नगरपरिषदेतील सफाई कामगारांना मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते मिठाई वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली नगरपरिषदेतील सफाई कामगारांना मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते मिठाई वाटप

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली नगरपरिषदेतील सफाई कामगारांचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या महार...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली नगरपरिषदेतील सफाई कामगारांचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या महाराष्ट्र सरचिटणीस तथा भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्ष मुन्नाताई चावरे यांच्या पुढाकारातून दिवाळी सणा निमित्ताने मिठाई वाटप करण्यात आले.मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.











सफाई कामगारांच्या प्रश्नांवर नेहमीच लढा देणाऱ्या मुन्नाताई चावरे यांनी देवळाली नगरपालिकेतील सफाई कामगारांना दिवाळी निमित्ताने बोनस व ऍडव्हान्स मिळावा अशी मागणी केली होती.



चावरे यांची मागणी मुख्याधिकारी अजित निकत यांनी ही मागणी केली. त्यानुसार ठेकेदार साहेबराव शेवाळे यांनी बोनस व ऍडव्हान्स सफाई कामगारांना अदा केल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 







सफाई मजदूर काँग्रेसच्या नेत्या मुन्ना चावरे यांनी कामगारांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मिठाई वाटप केले मुख्याधिकारी निकत ,बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सुरेश मोटे,यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.


यावेळी देवळाली नगरपालिकेचे स्वच्छता व पर्यावरण दूत शिवचरित्रकार हसन सय्यद,कृष्णा महांकाळ, विकास गडाख, भीम आर्मीच्या राहुरी तालुकाध्यक्ष दीपाली सोनवणे, सचिव अनिता म्हस्के, सफाई मजदूर काँग्रेसच्या शहराध्यक्ष शोभाताई ननावरे, कविता थोरात, रोहित शेलार,करण आडागळे,प्रकाश कदम, अर्जुन आडगळे आदींसह सफाई कामगार बंधू व महिला उपस्थित होत्या.


देवळाली प्रवरा नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये पश्चिम भारतात तृतीय क्रमांक आल्याबद्दल सफाई मजदूर काँग्रेस व भिम आर्मीच्या वतीने मुख्याधिकारी निकत यांचा सन्मान करण्यात आला.


तर सफाई मजदूर मुन्नाताई चावरे यांनी सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला लढा नेहमीच सुरूच राहील तसेच  मुख्याधिकारी अजित निकत व ठेकेदार साहेबराव शेवाळे यांनी आमच्या सफाई कामगारांची दिवाळी गोड केल्याबद्दल आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत