नगर-मनमाड महामार्गाचे काम ' या' तारखेपासून सुरू होणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर-मनमाड महामार्गाचे काम ' या' तारखेपासून सुरू होणार

  अहमदनगर(वेबटीम):- अंत्यत दयनीय अवस्था झालेल्या व गेल्या अनेक महिन्यापासून काम बंद पडलेल्या नगर-मनमाड महामार्गाचे काम १ जानेवारी २०२३ पासून...

 अहमदनगर(वेबटीम):-


अंत्यत दयनीय अवस्था झालेल्या व गेल्या अनेक महिन्यापासून काम बंद पडलेल्या नगर-मनमाड महामार्गाचे काम १ जानेवारी २०२३ पासून सुरू होणार असल्याची माहिती खा. डॉ.सुजय विखे यांनी दिली.


सोमवारी नगर-मनमाड महामार्गाची पाहणी केली. यावेळी नगरचे आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.


डॉ. विखे पाटील यांनी सांगितले, 'केंद्राच्या पथकाने नगर-मनमाड रस्त्याची अवस्था पाहिली. ६८० कोटी रुपये (जीएसटी वगळून) या कामाचा दर निश्चित करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात सुमारे ८०० कोटी रुपयांची निविदा निघणार आहे.


नियमाप्रमाणे ४५ दिवसांची निविदा असते. मात्र विशेष बाब म्हणून शॉर्ट टेंडर केले जाणार आङे. त्यातून ३० दिवसांत ठेकेदार नियुक्त होईल आणि १ जानेवारी २०२३ पासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे.


तोपर्यंत खड्डे बुजविण्यासाठी ८ कोटी रुपये उपलब्ध झाले असून त्याचे काम सुरू आहे असेही खा. विखे यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत