राहुरी(वेबटीम) ओला दूष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रूपयांची मदत मिळावी, शेती पंपाचे भारनियमन रद्द करून विनाकपात दिवसा १...
राहुरी(वेबटीम)
ओला दूष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रूपयांची मदत मिळावी, शेती पंपाचे भारनियमन रद्द करून विनाकपात दिवसा १२ तास विज मिळावी, काटा मारीत होत असलेली लूट थांबवून सर्व कारखान्याचे काटे ऑनलाईन करून नियंत्रित प्रणाली विकसित करण्यात यावी, रीकव्हरी चोरून होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशा विविध प्रमुख मागण्या संदर्भात आवाज उठविण्यासाठी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या पुढाकारातुन मंगळवार १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
मा.खा.राजू शेट्टी हे शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकारसह साखर कारखानदारींना काय इशारा देणार याचीच उत्सुकता लागली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध आंदोलनातून आवाज उठवत राजू शेट्टी कायमच राज्यात चर्चेत असतात. कोल्हापूर जिल्ह्यात उसाला योग्य भाव मिळवून एफआरपी मिळावा या मागणीसाठी कित्येक आंदोलन राजू शेट्टी यांनी केले. तसेच या आंदोलनामुळे मागण्यांचा विचार देखील करावा लागला.
त्याच पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी हे नगर जिल्ह्यातील कोणकोणते कारखाने नियमानुसार ऊसाला भाव देतात. यावर भूमिका मांडण्याची शक्यता आहे. ऊस परिषदेच्या माध्यमातून काय भूमिका मांडणार आता हेच बघावे लागणार आहे.
दरम्यान, मंगळवार दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या ऊस परिषदेस शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत