व्यंकटा ऑईल हब्जच्या माध्यमातून लवकरच सीएनजी पंप सुरू होणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

व्यंकटा ऑईल हब्जच्या माध्यमातून लवकरच सीएनजी पंप सुरू होणार

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालागत व्यंकटा ऑईल हब्जच्या माध्यमातून तालुक्यातील प्रथम सीएनजी पंप सुरू लवकरच ...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालागत व्यंकटा ऑईल हब्जच्या माध्यमातून तालुक्यातील प्रथम सीएनजी पंप सुरू लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सुधीर दगडूराम तनपुरे यांनी दिली.

 

देशात नैसर्गिक वायू इंधन देण्याचे नियोजित करण्यात आले असून त्या अंतर्गत प्रदूषण कमी करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. ते कमी करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी नैसर्गिक वायुचा वापर, इंधनासाठी केला जात आहे. त्याच अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी सीएनजी पंपाचा निर्णय घेण्यात आला आहे. 


राहुरी तालुक्यात सीएनजी पंप नसल्याने वाहन चालकांची मोठी पंचाईत होत होती. मात्र ही आता दूर होणार आहे. राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावर व्यंकटा ऑईल हब्जच्या माध्यमातून तालुक्यातील प्रथम सीएनजी पंप सुरू होणार आहे. सर्व सुविधांनी युक्त असलेल्या या पंपाचे जवळपास काम पूर्ण झाले असून नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे व्यंकटा ऑईल हब्जचे सर्वेसर्वा सुधीर तनपुरे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत