राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना व आदर्श नागरी पतसंस्थेचे सेवानिवृत्त कॅशियर निवृत्ती पाटीलबा देसाई(व...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना व आदर्श नागरी पतसंस्थेचे सेवानिवृत्त कॅशियर निवृत्ती पाटीलबा देसाई(वय-९०) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. आज दुपारी २ वाजता तनपुरे कारखाना अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
निवृत्ती देसाई हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. तनपुरे कारखान्यात कॅशीयर म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यानंतर १८ वर्षे आदर्श नागरी पतसंस्थेत कॅशीयर म्हणून नोकरी केली. त्यांच्या निधनामुळे राहुरी फॅक्टरी परिसरातील विविध क्षेत्रातील मंडळींकडून शोक व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत