राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवस...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम ओके असे म्हणून निषेध केला आहे.
यावेळी खा.लोखंडे यांना काळे झेंडे दाखवत संतप्त भावना व्यक्त केल्या आहे.
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिंदे गटात प्रवेश केला आहे.त्यानंतर त्यांनी जिल्हाभरात शिवसेना शिंदे गटाची कार्यकारणीही जाहीर केली.
याच पार्श्वभूमीवर खा. लोखंडे ३२ गावांच्या दौऱ्यावर असताना टाकळीमियाँ येथे पोहोचल्यानंतर शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम ओके अशा निषेध पर घोषणा दिल्या यावेळी खा.लोखंडे यांना काळे झेंडेही दाखवून निषेध नोंदवला
दरम्यान या ठिकाणाहून काही शिवसैनिकांना राहुरी पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत