राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते विजय ग व्हाणे यांचा वाढदिवस आज प्...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते विजय गव्हाणे यांचा वाढदिवस आज प्रसादनगर भागातील गोपाल कृष्ण गोशाळा येथे साजरा करण्यात आला.यावेळी गोपाल कृष्ण गोशाळेतील ८० जनावरांना चारा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमास युवा नेते राजुभाऊ शेटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी म्हणून विजय गव्हाणे यांच्या मित्र परिवाराने गोशाळेत चारा देऊन प्राण्यांवर दया करा असा संदेश दिल्याचे राजुभाऊ शेटे यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित शेठ चोरडिया यांनी केले.यावेळी विजय गव्हाणे यांचा सन्मान राजुभाऊ शेटे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास युवा उद्योजक गणपत गव्हाणे, सुधीर झांबरे, भूषण नालकर, अतुल त्रिभुवन, सोमनाथ कीर्तने, बाबाजी जगधने,दत्ता खांदे, युवराज लहानगे, निखिल गोपाळे,स्वप्नील बोरुडे, मनोज डोंगरे, प्रमोद विधाटे,अक्षय काळे,नारायण घाडगे,सतीश औटी,ऋषी आढाव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत