सात्रळ डॉ. सोनांबेकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने मोफत आरोग्य निदान शिबीर संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ डॉ. सोनांबेकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने मोफत आरोग्य निदान शिबीर संपन्न

  सात्रळ(वेबटीम) येथे  डॉ. सोनांबेकर  मल्टिस्पेशालिटी  हॉस्पिटल, संगमनेर यांचे  मोफत  आरोग्य  निदान शिबीर संपन्न झाले . येथील मारुती  मंदिर ...

 सात्रळ(वेबटीम)




येथे  डॉ. सोनांबेकर  मल्टिस्पेशालिटी  हॉस्पिटल, संगमनेर यांचे  मोफत  आरोग्य  निदान शिबीर संपन्न झाले .


येथील मारुती  मंदिर सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात  नाक, कान, घसा तसेच स्वरयंत्र  व श्वास  नलिका  यांच्या  संदर्भातील  आजारांचे मोफत निदान  करून त्यासाठीचे औषधे देण्यात आली. 


तसेच विविध आजारावरील मोठया  उपचारांसाठी हॉस्पिटलने राबविलेल्या योजनांची  माहिती उपस्थित रुग्णांना देण्यात आली. मोफत आरोग्य निदान शिबिरास परिसरातील  नागरिकांनी मोठया प्रमाणात  उपस्थित  राहून आपल्या  नाक, कान, घसा  तपासणी करून लाभ घेतला. 


या प्रसंगी  सात्रळचे सरपंच  सतिष  ताठे, उपसरपंच  बाळासाहेब  पवार, ग्रामपंचायत  सदस्य  तसेच नागरिक, सोनांबेकर  हॉस्पिटल चे कैलास अरगडे, डॉ. पूजा शिंदे, संदीप  शिंदे, ब्रदर  निकम, दळे सिस्टर, साईकिरण गडगे  व  इतर कर्मचारी  उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत