राहुरी(वेबटीम) शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनासाठी आलेली ६० वर्षीय महिला बेपत्ता झाली आता ती राहुरी तालुक्यातील गुहा येथे आढळून आली. सद...
राहुरी(वेबटीम)
शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनासाठी आलेली ६० वर्षीय महिला बेपत्ता झाली आता ती राहुरी तालुक्यातील गुहा येथे आढळून आली. सदर महिलेची गुहा गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आस्थेने विचारपूस करून तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
कर्नाटक राज्यातील मूळ रहिवासी व हल्ली मुंबईत राहणारी दुरगम्मा कनेगरी ही ६० वर्षीय महिला १३ नोव्हें रोजी नातेवाईकांसोबत शिर्डी येथे सद्गुरू साई मंदिरात दर्शनासाठी आली होती. रविवारी मोठी गर्दी असल्याने ही महिला बेपत्ता झाली होती. याबाबत नातेवाईकांनी शिर्डी पोलीस ठाण्यात मिसींग बाबत तक्रार दिली होती.
सदर महिला १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता गुहा गावात आढळून आली. यावेळी डॉ.विजय वाबळे, उपसरपंच रामा बर्डे, सौरभ कोळसे, रवींद्र डौले, भारत शिरसाठ, विलास बर्डे, किरण डौले, ऋषि गागरे, जयेश जयस्वाल आदींनी तिची आस्थेने चौकशी केली. सदर महिला शिर्डीतुन बेपत्ता झाल्याची माहिती समजताच तातडीने शिर्डी पोलिसांशी संपर्क करून नातेवाईकांकडे तिला नातेवाईकांकडे देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत